वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्नाटकाची महिला मल्ल श्वेता संजू अन्निकेरीने 49 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले.
श्वेताचे राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. 2022 च्या राष्ट्रीय कॅडेट चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने कास्य तर 2021 च्या उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने कास्यपदक मिळवले होते. नवी दिल्लीतील या स्पर्धेमध्ये मुलींच्या 61 किलो वजन गटात लिझा तोमरने कास्यपदक मिळवले. उत्तर प्रदेशमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी झालेल्या स्पर्धेत आयआयएसतर्फे सहभागी झालेल्या मल्लांनी एकूण 8 पदकांची कमाई केली.
मुलांच्या 60 किलो वजनगटात सोनू उडाने सुवर्णपदक घेतले. हर्षवर्धन भोयारने 65 किलो गटात, मोहमद शेहजादने 71 किलो गटात तर अश्वानी यादवने 71 किलो गटात कास्यपदक मिळवली. महिलांच्या 53 किलो गटात वरिष्ठांच्या विभागात आयआयएसच्या पुष्पा यादवने तसेच हर्षिताने 72 किलो गटात प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवले.
भारत-नेपाळ महिला क्रिकेट अंध संघामध्ये मालिका









