शाहुवाडी प्रतिनिधी
तळपती ज्योत ‘भगवा झेंडा ‘आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा घोष करत . छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आलेले शिवजयंती शाहूवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .पन्हाळगड ‘ विशाळगड या ठिकाणाहून ज्योत घेऊन अनेक शिवप्रेमी येत होते . उचत येतील संयुक्त उचतकर येथील युवकांनी पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत मलकापूर येथील सुभाष चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले .
शाहुवाडी तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात शिव जयंतीनिमित्त शिवमय वातावरण झाले होते . उचत येथील युवकांनी पन्हाळगडावरून ज्योत आणली होती . याबरोबरच तालुक्याच्या विविध भागात शिवजयंती निमित्त विशाळगड ‘ पन्हाळगड या ठिकाणावरून ज्योत घेऊन जाण्यासाठी अनेक ठिकाणाहून शिवप्रेमी आले होते .सर्वत्र भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवजयंती साजरी केली जात होती . चिमुकल्या सह सर्वांनीच शिवजयंती साजरी केली .
एकूणच संपूर्ण तालुक्यात शिवजयंतीचे अवचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले होते . मलकापूर येथील शिवतिर्थ सुभाष चौक या ठिकाणीही शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येत होते . उचत येथील संयुक्त उचतकर युवक यांच्या वतीने मलकापूर येथील शिवतीर्थ सुभाष चौक या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना युवक