वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विमा घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. मलिक यांनी शुक्रवारी स्वत:च याबाबत माहिती दिली. माझ्याविरोधात नोंदवलेल्या प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने अकबर रोड गेस्ट हाऊसवर माहिती घेण्यासाठी बोलावले आहे. मात्र, सध्या मी राजस्थानला जात असल्याने मी सीबीआयला 27 ते 29 एप्रिल या तारखा दिल्याचे मलिक यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाबाबत दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी 300 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे.









