वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
प्रयागराजमधील उमेश पाल हत्या प्रकरणानंतर फरार असलेली माफिया अतिक अहमदची पत्नी शाईस्ता खान आणि गुड्डूमुस्लीम लवकरच आत्मसमर्पण करू शकतात. उत्तर प्रदेश पोलीस शाईस्ता आणि गुड्डू मुस्लिमचा शोध घेत आहेत. उमेश पाल हत्याकांडातील आरोपी माफिया अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांना एसटीएफने 13 एप्रिल रोजी झाशी येथे चकमकीत ठार केले. यानंतर 15 एप्रिल रोजी प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलबाहेर तीन हल्लेखोरांनी माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. या दोन्ही घटनांनंतर आता अतिक अहमदच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांची धडपड सुरू आहे.
आपला मुलगा अतिक चकमकीत मारला गेल्यानंतरही शाईस्ता पुढे आली नाही. यानंतर पतीची हत्या झाल्यानंतरही अखेरच्या दर्शनासाठी ती आली नाही. सध्या ती गुगुड्डू मुस्लीमसोबत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली असून तो शाईस्ताला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही दिल्ली किंवा गुजरातमध्ये आत्मसमर्पण करू शकतात अशी अटकळ बांधली जात आहे. शरणागतीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एसटीएफ टीमलाही सतर्क करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी गुड्डू मुस्लीमवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे, तर शाईस्ता परवीनवर 50 हजारांचे बक्षीस आहे. उमेश पाल हत्या प्रकरणात शाईस्ता हिचे नाव गोवले गेले आहे.









