बिग बॉस या टीव्ही शोद्वारे प्रसिद्धी मिळविणारी शहनाज गिल सध्या चर्चेत आहे. शहनाजने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण केले आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. शहनाजसोबत या चित्रपटात सलमान खान अणि पूजा हेगडे हे दिग्गज कलाकार आहेत.

फरहाद सामजीकडून दिग्दर्शित या चित्रपटात पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुया, वेंकटेश, भूमिका चावला आणि जस्सी गिल हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. किसी का भाई किसी का जान या चित्रपटानंतर शहनाजला आता आणखी एक चित्रपट मिळाला आहे.
शहनाज आता रिया कपूरच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रियाचा पती करण बुलानी करणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर अन् अनिल कपूर मुख्य भूमिकेत असतील. रिया कपूरकडून निर्मित या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात उत्तम काम करण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे शहनाजने म्हटले आहे.









