वाहन, धातूमध्ये विक्री : सेन्सेक्स 23 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी मात्र बीएसईमधील काही क्षेत्रांमध्ये सकारात्मक स्थिती राहिल्याचे दिसून आले. यामध्ये वाहन, धातू व रियल इस्टेट क्षेत्रात विक्रीचा मारा राहिल्याने सेन्सेक्सचा तेजीचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. बीएसई सेन्सेक्स 22.71 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. तर एनएसई निफ्टी मात्र घसरणीसोबत बंद झाला.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 22.71 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,655.06 वर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.40 अंकांसोबत निर्देशांक 17,624.05 अंकांवर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये आयटीचे समभाग सर्वाधिक 1.92 टक्क्यांनी वधारुन बंद झाले, तसेच एचडीएफसी लाईफचे समभाग 3.16 टक्के प्रभावीत होत बंद झाले आहेत.
या क्षेत्रांची चमक
शेअरबाजारात शुक्रवारच्या सत्रात विविध क्षेत्रांमध्ये रियल इस्टेटचा निर्देशांक दोन टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. यासोबतच वाहन, धातू यांचे निर्देशांक 1 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. यामध्ये एफएमसीजी 0.89 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक काहीशा घसरणीसह बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये आयटीसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे 1.99 टक्क्यांनी वधारले असून यामध्ये टीसीएस 1.84, विप्रो 1.42, एशियन पेन्ट्स 1.27, एचसीएल टेक 1.09, एचडीएफसी 0.64, कोटक महिंद्रा बँक 0.51 आणि बजाज फायनान्सचे समभाग हे 0.44 टक्क्यांनी मजबूत राहिल्याची नेंद केली आहे. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे समभाग 2.26 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यामध्ये मारुती सुझुकी 1.86, टाटा स्टील 1.71, अल्ट्राटेक सिमेंट 1.49 आणि टाटा मोर्ट्सचे समभाग हे 1.22 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. सध्या तिमाहीचा कालावधी सुरु असून यात विविध कंपन्यांकडून आपल्या कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर करण्यात येत आहेत. या तिमाही अहवालावर आधारीत गुंतवणूकदार आगामी आठवड्यासाठी आपली मार्चे बांधणी करत असून तेव्हा येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदार काय भूमिका घेतात हे पहावे लागणार असल्याचे शेअरबाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.









