शिरोळ प्रतिनिधी
Jaysingpur Market Committee Election : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत 99 पैकी 78 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सात जागा बिनविरोध करण्यात आल्या तर अकरा जागेसाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने दुरंगी लढत होणार आहे. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सोसायटी महिला प्रतिनिधी गट,ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटत्याबरोबर व्यापारी, अडते व हमाल तोलाई गटातील अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या गटाची निवडणूक बिनविरोध झाली.
बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय आघाडीचे सात संचालक बिनविरोध झाले आहे तर सोसायटी गटातून इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, भटक्या जाती व जमाती आणि ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटातील ११ जागेकरीता २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने निवडणुका होत आहे.३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी मत मोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
जयसिंगपूर बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींनी सर्वसमावेशक आघाडी तयार करण्याची भूमिका घेतली. आ. डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दत्तचे संचालक अनिलराव यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, दत्तचे संचालक शेखर पाटील, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, स्वाभिमानीचे नेते सावकार मारनाईक, सचिन शिंदे यांनी काटकसरीने चालवत असलेली बाजार समितीची निवडणूक होऊन संस्थेवर आर्थिक बोजा पडू नये याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे गट, आरपीआय, यासह मित्र पक्षाची समविचारी आघाडी तयार करून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले परंतु त्यांना यश आले नाही.
बाजार समिती निवडणुकीत बिनविरोध झालेले उमेदवार पुढील प्रमाणे
सोसायटी महिला राखीव गट- सौ दिपाली सतीश चौगुले, (उदगाव), सौ माधुरी बाबासो सावगावे, (कुरुंदवाड) ग्रामपंचायत
अनुसूचित जाती -सिद्राम दत्तू कांबळे ,(नांदणी) ग्रामपंचायत
आर्थिकदृष्ट्या दुर्बल -किरण कल्लाप्पा गुरव, (टाकवडे )
व्यापारी व आडते- प्रवीणकुमार मेघराज बलदवा, दादासो बाळकू ऐनापुरे, (जयसिंगपूर )
हमाल व तोलाई- भगवान भीमराव पाटील (जयसिंगपूर)
दरम्यान, सोसायटी सर्वसाधारण गट ७ जागेसाठी १४ सोसायटी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १ जागेसाठी २ सोसायटी भटक्या जाती व जमाती १ जागेसाठी २ ग्रामपंचायत सर्वसाधारण २ जागेसाठी ३ अशा एकूण ११ जागांकरिता २१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे या ११ जागेकरिता बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे
सोसायटी सर्वसाधारण गटाचे उमेदवार
सुरेश शिवगोंडा माणगांवे( दानोळी), रामदास ईश्वरा गावडे (शिरोळ ),मुजम्मिल खादर पठाण( आलास), विजयसिंह नारायण देशमुख (शिरोळ), सुभाषसिंग गोपालसिंग रजपूत (मौजेआगर), महावीर सातगोंडा पाटील( हसुर), शिवाजी बाळासो चव्हाण(शिरोळ)
सोसायटी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी सोसायटी गट -दऱ्यांप्पा बाबू सुतार (दत्तवाड)
भटक्या जाती व जमाती- चंद्रकांत कृष्णा जोंग (कुरुंदवाड)
ग्रामपंचायत सर्वसाधारण गट -आण्णासो भीमू पाणदारे, (अकिवाट) संजय नायकू अणुसे,( तेरवाड) हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.