पन्हाळा तालुक्यातील युवकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील एका भागातल्या 14 वर्षाच्या मुलीचा सतत पाठलाग 19 वर्षाच्या मुलाने करुन तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्याची धमकी देत तिच्यावर सेव्हन स्टार परिसरातील पॅफेसह तीन ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मेणगेंवाडी (ता. पन्हाळा) येथील युवकावर गुन्हा दाखल केलेला असून अद्याप त्या युवकास अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 14 वर्ष 4 महिन्याची मुलगी ही एका शाळेत शिकत असताना संकेत मेणगे (वय 19) हा तिचा सतत पाठलाग करायचा. तिला त्रास द्यायचा. त्याने तिला गोड बोलून तिच्यासोबत फोटो काढून ते व्हायरल करेन अशी धमकी देत त्या शाळेच्या जवळील एका जागेत तिच्या इच्छेविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात शारीरिक संबंध ठेवले. तेथून त्या युवकाने तिला सेव्हन स्टार इमारतीतील फोर एव्हर या पॅफेत बोलवून तेथेही तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. पुढे हॉटेल पर्ल येथेही त्याने बोलवून घेऊन शारीरिक संबंध ठेवले. दि. 13 एप्रिल पर्यंत संकेतने त्या मुलीला ब्लॅकेमेल करुन तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याची फिर्याद तिच्या आईने शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे करत आहेत. त्या युवकास अद्याप अटक केली नाही.








