सरवडे प्रतिनिधी
राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज झालेल्या मतदानामध्ये ५८६५ मतदानपैकी ३७७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामुळे निवडणुकीमध्ये ६४.३ टक्के मतदान नोंदले. तर संस्था गटातील १०५ पैकी १०५ मतदारांनी १०० टक्के मतदान नोंदवले.आज गुरुवारी राधानगरी येथे मतमोजणी होणार आहे.
या संघाच्या निवडणुकीत १५ जागेसाठी २५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.सत्ताधारी श्री राजर्षी शाहु आघाडीच्या विरोधात शिवशंकर परिवर्तन आघाडीने लढत दिली. आज झालेल्या १७ केंद्रावर मतदान झाले. सकाळी व दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. केंद्रानिहाय झालेली मतदान आकडेवारी अशी, राधानगरी केंद्र पहिले ५७.४ टक्के,दुसरे ६६.४ ,सावर्डे पा.७६.३,नरतवडे ७४.८,सरवडे केंद्र पहिले ८०.८,दुसरे केंद्र ७६.६,तुरंबे ६५.१,कपिलेश्वर ७४.९,चंद्रे ६९.२,राशिवडे बु.२१.२,मोहडे ४४,आमजाई व्हरवडे ५२.६,कंथेवाडी ७३.९,क तारळे ५८,खिंडी व्हरवडे १०,आडोली ८५.६, टक्के मतदान नोंद झाले. आज होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता सहाय्यक निबंधक कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.









