सावंतवाडी / प्रतिनिधी
Librarian Mahendra Patel felicitated by Sri Ram Vachan Mandir!
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र पटेल याना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार जाहीर झाला होता . आदर्श ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पटेल यांचा मंगळवारी श्रीराम वाचन मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला गडहिंग्लज येथील घाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष एडवोकेट संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे संचालक प्राध्यापक जी ए बुवा, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष एडवोकेट संग्राम देसाई, सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट परिमल नाईक प्राध्यापक प्रवीण बांदेकर रेखा नार्वेकर आदी उपस्थित होते









