प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : कळंबा कारागृहामध्ये मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोन मोबाईल, गांजा, डेटा केबल, चार्जर सापडले. कळंबा मध्यवर्ती कारागृहामधील तटाकडील आतील बाजूस शेतीच्या परिसरात मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद कारागृह पोलीस शिपाई विजय तुकाराम बनकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. कारागृहात पुन्हा मोबाईलसह गांजा आढळल्याने कारागृह यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कारागृहाच्या सुरक्षेला पुन्हा एकदा तडा गेला आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तटाकडील बाजूस शेतीचा परिसर आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी विजय बनकर हे बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते गस्त घालत असताना त्यांना शेतामध्ये काट्या व गाठी असलेल्या खाकी चिकटटेपमध्ये गांजा, पांढऱ्या कापडामध्ये दडवून ठेवलेला गांजा, तसेच त्याच परिसरात काळ्या रंगाचा लाल बॉर्डर असलेला एक मोबाइल हॅण्डसेट मिळाला. त्यामध्ये लाल रंगाची बॅटरीही होती. तसेच काळ्या रंगाचा मोबाईल हॅण्डसेट आणि लाल रंगाची बॅटरी ही मिळाली. तसेच एक डाटा केबल नसलेला चार्जर आणि दोन डेटा केबल स्वतंत्र मिळाल्या. त्यामुळे फिर्यादीन बनकर यांनी याची माहिती कारागृह अधिक्षकांना दिली. त्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे बनकर यांनी जुना राजवाड पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास हा गुन्हा रेकॉर्डवर दाखल केला. यामध्ये कारागृह सुरक्षा अधिनियम कायदा 1894 च्या काही कलमांसह गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे अंमलदार सागर पाटील यांनी ही फिर्याद घेतली.
यापूर्वीही असाच प्रकार
26 डिसेंबर 2020 रोजी कळंबा कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरुन कारागृहात बॉलमधून गांजा व पेन ड्राईव्ह फेकण्यात आले होते. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कुख्यात गुंड विकी खंडेलवाल सह भिम्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अन्य 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही बॉलमधून गांजा व मोबाईल तटबंदीजवळ आढळला होता. यावेळीही अशाच प्रकारे गांजा फेकला आहे काय असा सवाल उपस्थित होत आहे.
सिसीटीव्ही फुटेज ताब्यात
कळंबा कारागृहात आढळलेल्या गांजा व मोबाईल प्रकरणाची दखल कारागृह प्रशासनानेही घेतली आहे. कळंबा कारागृहाने याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली असली तरी कारागृह प्रशासनाकडून याचा तपास सुरु आहे. कारागृहातील सर्व सिसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.
Previous Articleमहाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र; संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा अन्यथा …
Next Article NIA ने कारवाई केलेली पीएफआयची शाळा अनधिकृत
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.