दोन वर्षानंतर पैकुळ- गुळेली संपर्क जोडणार : “12 कोटी खर्च : नागरिकांत समाधान
वाळपई : गेल्या दोन वर्षापासून सदर पुलाचे बांधकाम सुरू होते रगाडा नदीवर या पुलाची उभारणी करण्यात येत होती. अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. त्यावर मात करून या ठिकाणी नवीन पुलचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी नवीन पूल सुरू होईल. या पुलावर हॉटमिक्सद्वारा डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे लोकांची मागणी लवकरच पूर्णत्वास येणार असल्यामुळे पैकुळ नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे. गुळेली पंचायत क्षेत्रातील पैकुळ येथे जाण्यासाठी अऊंद पूल होता. या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याची मागणी सातत्याने पैकुळ नागरिकांनी केली होती. म्यान 27जुलै 2021 रोजी मोठ्या पावसामुळे रगाडा नदीला आलेल्या महापुरामध्ये पैकुळचा जुना पूल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला व गुळेली-पैकुळ संपर्क तुटला. सदर ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करून लोकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. 2021 साली पूल कोसळल्यानंतर या नवीन पुलाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली व त्याला 13 कोटी खर्चून या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली होती.
सुमारे 12 कोटी खर्चून पुलाची उभारणी
सुमारे 12 कोटी खर्चून सदर पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे. सध्यातरी सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. आज सदर ठिकाणी हॉटमिक्सद्वारे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुऊवात करण्यात आली. दोन्ही बाजूने हॉटमिक्स करण्यात आलेली आहे. दरम्यान या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ग्रामस्थांनी सांगितले की आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नामुळे या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. मध्यंतरी काही प्रमाण अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्या अडचणीवर मात करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विशेष लक्ष घातले. यामुळेच या पुलाचे पूर्णत्वास येऊन या भागातील लोकांची गैरसोय आता दूर होणार आहे. अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी देऊन समाधान व्यक्त केले आहे.
नवीन पुलामुळे पैकुळच्या विकासाला चालना
पैकुळ पुलाच्या उभारणीसाठी आपण पूर्वीपासून प्रयत्न सुरू केले होते. मात्र हा पूल कोसळल्यानंतर या प्रयत्नांना गती आली. ज्या ठिकाणी जुना पूल कोसळला होता त्याच ठिकाणी नवीन पुलाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आजपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुऊवात झालेली आहे. लवकरच या संदर्भाचा उद्घाटन समारंभ करण्यात येणार असून त्यानंतर पैकुळ गावातील नवीन सुविधाचा मार्ग मोकळा होणार आहे.. या पुलामुळे पैकुळ भागाच्या विकासाला चालना प्राप्त होणार आहे. कारण कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. जुन्या पुलावरून फक्त चार चाकी वाहने नेता येत होती. आता अवजड प्रकारची वाहतूक होणार असल्यामुळे चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे याच भागातून धारबांदोडा या ठिकाणी जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे हा गाव आता विकासाच्या प्रवाहात येणार असल्याची प्रतिक्रिया विश्वजित राणे यांनी व्यक्त केली आहे.









