एफएमसीजी क्षेत्रातील समभाग प्रभावीत : सेन्सेक्समध्ये 183 अंकांची घट
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल 183.74 अंकांनी नुकसानीत राहिला होता.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 183.74 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 59,727.01 वर बंद झाला आहे. यासह दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,660.15 वर बंद झाला आहे. यावेळी सेन्सेक्समधील 30 समभागापैकी 15 समभाग तेजीत तर 15 प्रभावीत झाले आहेत.
बीएसई सेन्सेक्सवर पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.62 टक्क्यांनी बंद झाले आहेत. यासह अल्ट्राटेक सिमेंट 1.85 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.13, टायटन 1.12 आणि एचडीएफसी 0.75 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, आयटीसी, आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत.
याच्या विरुद्ध बाजूला एचसीएल टेकचे समभाग 1.99 टक्क्यांनी वधारले असून यासोबतच इंडसइंड बँक, विप्रो, सनफार्मा, मारुती, एशियन पेन्ट्स, टाटा स्टील व स्टेट बँक, एनटीपीसी व इन्फोसिससह टाटा मोर्ट्सचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
आयटी कंपन्या तेजीत
दिवसभरातील कामगिरीमध्ये मंगळवारी आयटी, औwषध, धातू, हेल्थकेअर या क्षेत्रात तेजी राहिली आहे. यासोबतच एनर्जी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल, ऑईल अॅण्ड गॅस यासारख्या क्षेत्रात घसरणीची नोंद करण्यात आली आहे. यावेळी मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकात मात्र तेजी राहिली होती. माहिती तंत्रज्ञान, पीएसयू बँक आणि धातू यांचे निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी वधारले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणीसह 82.04 वर बंद झाला आहे. या अगोदरच्या सत्रात तो 81.97 वर बंद झाला.









