सावंतवाडी / प्रतिनिधी
Argument among vegetable sellers in Tuesday’s weekly market!
मंगळवारचा आठवडा बाजार मोती तलावाकाठी भरत आहे . हा आठवडा बाजार तलावाच्या फूटपाथ वरून हलवण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. या तलावाच्या काठी आठवडा बाजार गेली दोन वर्ष भरत आहे. मात्र या आठवडा बाजार जागा स्थलांतरावरून राजकीय वाद शाब्दिक रित्या सुरू आहे. असे असतानाच या आठवडा बाजारातील काही छोटे विक्रेते या- ना त्या कारणावरून आपापसात वादावादी करत आहेत . आजच्या मंगळवारच्या आठवडा बाजारात नगरपालिकेसमोरील भागात वाहतूक पोलीस असलेल्या जागेपासून काही अंतरावरच भाजीविक्रेते मध्ये वादंग झाला. चक्क एका तरुणाने हातात भले मोठी काटी घेऊन महिलेच्या डोक्यावर घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वाहतूक पोलीस सुनील नाईक व पालिका आरोग्य विभागाचे निरीक्षक, पांडुरंग नाटेकर वेळीच धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. सदर तरुणाने भाजीविक्रेते महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. हा प्रकार भर बाजारपेठेत ग्राहकांच्या समोर घडत होता वाहतूक पोलीस श्री नाईक यांनी सदर तरुणाला चांगलेच खाकी वर्दीचा हिसका दाखवला. त्यामुळे सदर तरुणाने तेथून काढता पाय घेतला मात्र काही मिनिटे हा प्रकार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजाराच्या ठिकाणी अनेकांनी पाहिला.