Yogi Adityanath : आता कोणताही व्यावसायिक गुन्हेगार आणि माफिया कोणत्याही उद्योजकाला धमकावू शकणार नाही. उत्तर प्रदेश आज तुम्हाला सर्वोत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची खात्री देतं अस वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. अतिक आणि अशरफ अहमदच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.यावरून योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, खड्डे दिसायला सुरुवात झाली की उत्तर प्रदेशची सीमा सुरू झाली अस पूर्वी म्हटलं जायचं.पण
आमच्या काळात विकासासाठी ओळखलं जातंय.आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी जोडण्याचे काम आम्ही केलं आहे. जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वतः संकटात आहेत.आता भिण्याचे काही कारण नाही. उत्तर प्रदेशात आज सर्वोत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची खात्री आम्ही तुम्हाला देतो.
अतिक-अशरफ हल्लाप्रकरण नेमकं काय
अतिक अहमद आणि अशरफ अहमद याची शनिवारी हत्या करण्यात आली. या दोघांना अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी त्यांना प्रयागराज येथील रुग्णालयात नेलं. रुग्णालयात जात असताना प्रवेशद्वाराजवळच माध्यम प्रतिनिधींनी या दोघांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. हे दोघेही काही बोलणार इतक्यात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्यात असणाऱ्या दोघांनीच या दोघांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे अतिक आणि अहमदचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्ला करणारे दोघेजण आणि त्यांचा एक साथीदार पोलिसांना शरण गेले.
Previous Articleअनधिकृत होर्डिंग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Next Article कारागिरांकडून सराफ व्यावसायिकाची 26 लाखांची फसवणूक









