भाजपसह काँग्रेसच्या उमेदवारांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज : महानगरपालिका कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज 13 एप्रिलपासून दाखल करण्यास सुऊवात झाली आहे. सोमवारी जिल्ह्यातून तब्बल 74 अर्ज दाखल झाले आहेत. काही जणांनी दोन ते तीनवेळा अर्ज दाखल केले आहेत. आता गुऊवार दि. 20 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे येत्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उमेदवार अर्ज दाखल करणार असल्यामुळे तहसीलदार व महानगरपालिका कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निपाणी मतदारसंघातून भाजपतर्फे शशिकला जोल्ले यांनी अर्ज दाखल केला असून जेडीएसतर्फे राजाराम ऊर्फ राजू मारुती पोवार यांनी अर्ज दाखल केला आहे. चिकोडी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे गणेश प्रकाश हुक्केरी, इंडियन मूव्हमेंट पार्टीतर्फे आप्पासाहेब श्रीपती कुरणे तर अपक्ष म्हणून मोहन गुराप्पा मोटण्णावर यांनी अर्ज दाखल केला आहे. अथणी मतदारसंघातून भाजपतर्फे महेश इरणगौडा कुमठळ्ळी, काँग्रेसतर्फे भरमगौडा अलगोंडा कागे, कर्नाटक राष्ट्रीय समितीतर्फे विनोद सुखदेव नावग्रे, अपक्ष म्हणून सदानंद भैराप्पा मगदूम, सत्याप्पा दशरथ कालेळी यांनी अर्ज दाखल केले आहेत. कुडची मतदारसंघातून महेंद्र कल्लाप्पा तम्मण्णावर यांनी अर्ज दाखल केला आहे.
अरभावी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे अरविंद महादेव दळवाई, गोकाक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे महांतेश कल्लाप्पा कडाडी, बहुजन समाज पार्टीतर्फे रोलीत चंद्राप्पा भागण्णावर, अपक्ष म्हणून सुरेश बसाप्पा मरलिंगण्णावर, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून भाजपतर्फे नागेश आण्णाप्पा मन्नोळकर, कर्नाटक राष्ट्रीय समिती पार्टीतर्फे शकुंतला अशोक यळीगेर यांनी अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातून रवी बसलिंगाप्पगौडा पाटील, कर्नाटक राष्ट्रीय पार्टीतर्फे बसवराज मुरगेश जवळी, बैलहोंगल मतदारसंघातून काँग्रेसतर्फे महांतेश सदानंद कौजलगी, अपक्ष म्हणून विश्वनाथ इरणगौड पाटील, अमित विश्वनाथ पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. सौंदत्ती मतदारसंघातून मल्लिकार्जुन गंगाप्पा मुदनूर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर काँग्रेसतर्फे विश्वास वसंत वैद्य यांनी अर्ज दाखल केला आहे. रामदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे अशोक महादेवाप्पा पट्टण, अपक्ष म्हणून महादेवाप्पा शिवलिंगाप्पा यादवाड, भाजपतर्फे मल्लाप्पा शिवलिंगाप्पा यादवाड, भाजपतर्फे चिक्करेवण्णा आजाप्पा यांनी अर्ज दाखल केले आहेत. रामदुर्ग मतदारसंघामधून 3 जणांनी दोनवेळा अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव दक्षिण मतदारसंघातूनही एक अर्ज दाखल झाला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 74 अर्ज दाखल झाले असून येत्या दोन दिवसांत अजूनही अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.









