वार्ताहर/नंदगड
निधर्मी जनता दलाचे उमेदवार नासीर बागवान यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर येथील श्री चौराशीदेवी मंदिरापासून नासीर बागवान यांच्या मिरवणुकीला सुऊवात झाली. त्यानंतर जांबोटी सर्कलवरील बसवेश्वरांच्या पुतळ्याला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. त्यानंतर मिरवणूक छत्रपती शिवाजी सर्कलजवळ आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नासीर बागवान यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच स्टेशन रोडवरील दर्ग्यालाही हार घालण्यात आला. त्यानंतर मिनी विधानसौधमधील निवडणूक कार्यालयात जाऊन त्यांनी आपला अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत निजदचे तालुका अध्यक्ष एम. एम. साहुकार, विशाल पाटील, लायकअल्ली बिच्चूण्णावर, रेवणसिद्दय्या हिरेमठ, मेघा कुंदरगी, विरय्या हिरेमठ, बसवप्रभू हिरेमठ, आलिमअत्तर नाईक, परशराम मादार, रफिक वारीमणी, फाऊख नाईक, अल्ताफ खानापुरी, नासीर तिगडी, गोपाळ बाबसेट, मन्सूर तहसीलदार, इलियास पटेल, रामा गावडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









