वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान दाखल झाला आहे. आता या स्पर्धेतील लखनौच्या उर्वरित सामन्यात तो खेळणार आहे. मोहसीन खानला यापूर्वी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते.
2022 च्या आयपीएल हंगामात डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने नऊ सामन्यातून 14 गडी बाद केले होते. 2018 साली पहिल्यांदा मोहसीन खानचा आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात समावेश होता. आता 2023 च्या आयपीएल हंगामासाठी लखनौ संघाने मोहसीन खानला 20 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. लखनौ संघामध्ये मार्क वूड, आवेश खान, जयदेव उनादकट, यश ठाकुर, नवीन उल हक हे वेगवान गोलंदाज असून आता त्यामध्ये मोहसीन खानची भर पडली आहे.









