वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या टाटा आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवला स्पर्धा आयोजकांनी षटकांची गती धीमी राखल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रविवारी या स्पर्धेतील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला आपल्या षटकांची गती राखता आली नाही. आयपीएलच्या नियमानुसार गोलंदाजीत जो संघ षटकांची गती राखू शकत नसेल तर त्याला दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या नियमानुसार आता मुंबई इंडियन्सला हा दंड द्यावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात कोलकाता संघाचा पराभव केला होता. त्याचप्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितिश राणा याच्याकडून आयपीएलच्या शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याने त्याला मानधन रकमेतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.









