खाण्याचे बिल पाहून चक्रावून जाल
उत्तम खाद्यपदार्थांपासून डेटवर जाण्यासाठी प्रत्येकाला एका चांगल्या रेस्टॉरंटचा शोध असतो. एका अशाच रेस्टॉरंटचे इंटीरियर अत्यंत अनोखे आहे. येथील खाद्यपदार्थांचा आनंद घेतल्यावर तुम्ही येथील आठवणी विसरू शकणार नाही. या युनिक रेस्टॉरंटला जगातील सर्वात महाग रेस्टॉरंट मानले जाते. या रेस्टॉरंटचे नाव सब्लीमोशन असे आहे.

जगातील सर्वात महाग रेस्टॉरंट सब्लीमोशन स्पेन या देशात आहे. येथे कमी किमतीचे खाद्यपदार्थ मागविल्यावरही तुम्हाला 2 हजार डॉलर्सचे बिल भरावे लागते. भारतीय चलनात हा आकडा सुमारे 1 लाख 63 हजार इतका होतो. कधीकधी बिलाचा हा आकडा अधिक असू शकतो. सब्लीमोशन रेस्टॉरंट स्पेनच्या इबिसा बेटावर तयार करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये बसून तुम्ही मनाजोगे दृश्य पाहू शकता. स्वतःच्या हिशेबानुसार येथे अंतराळात डिनर करू शकता किंवा समुद्राखाली लंच करू शकता. या रेस्टॉरंटचे इंटीरियर अत्यंत खास असल्याने हे प्रतिकात्मक स्वरुपात शक्य झाले आहे.
हे रेस्टॉरंट ऍक्वेरियममध्ये तयार करण्यात आले आहे. खाण्यासह ऍडव्हेंचरमध्ये स्वारस्य बाळगणाऱया ग्राहकांसाठी हे रेस्टॉरंट डिझाइन करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यावर तुम्ही कधीच येथील आठवणी विसरू शकत नाही. येथे जाण्याचा अनुभव अत्यंत वेगळा असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येते.









