चीनला टाकले भारताने मागे : 128 अब्ज डॉलर्सचा व्यापार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीन या देशाला मागे टाकत अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार देश बनला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 128 अब्ज डॉलर्सचा व्यापार भारत-अमेरिका या उभय देशात झाला आहे.
या तुलनेत चीन आता भागीदीरीत दुसऱ्या नंबरवर पोहचला आहे. गेल्या काही वर्षात भारताचे अमेरिकेशी व्यावसायिक संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दोन्ही देशातील व्यापार 7.65 टक्के वाढला आहे. 2020-21 मध्ये हा व्यापार 119 अब्ज डॉलर्सचा झाला होता. 2020-21 वर्षात 80 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता.

निर्यातही वाढली
दुसरीकडे भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत 2022-23 मध्ये 2 टक्के वाढ झाली असून ती 78 अब्ज डॉलर्सची झालीय. पण याच कालावधीत अमेरिकेतून आयातीचे प्रमाण 16 टक्के वाढले असून ती 50 अब्ज डॉलर्सची झाल्याची माहिती आहे. याचदरम्यान भारत आणि चीन यांच्यातील व्यापार 2022-23 मध्ये 1.5 घसरणीसह 113 अब्ज डॉलर्सची राहिला आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात 115 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. भारताकडून होणारी चीनची निर्यात ही 28 टक्के कमी राहिली असून ती 15 अब्ज डॉलर्सची झाली आहे. तर आयात मात्र 4 टक्के वाढत 98 अब्ज डॉलर्सची झाली आहे.









