वृत्तसंस्था/ माँटे कार्लो (मोनॅको)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या टेलर फ्रिझचा पराभव केला.
क्ले कोर्टवर खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत शनिवारी पाचव्या मानांकित रुबलेव्हने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिझचा 5-7, 6-1, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. रुबलेव्हने या स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.









