कोरियाला हरवून भारताला चौथे स्थान
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा, ताश्कंद
बिली जिन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत जेसिका पेगुला आणि कोको गॉफ यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर अमेरिकन महिला टेनिस संघाने ऑस्ट्रियाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत फ्रान्स, स्पेन, झेक प्रजासत्ता, कझाकस्तान, जर्मनी, कॅनडा आणि इटली यांनीही अंतिम फेरी (फायनल्स) गाठली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 7 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने गट 1 मध्ये चौथे स्थान पटकावताना झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला.
अमेरिका आणि ऑस्ट्रिया यांच्यातील झालेल्या लढतीत अमेरिकेच्या पेगुला आणि गॉफ दोन्ही महिला टेनिसपटूंनी ऑस्ट्रियाच्या टेनिसपटू विरुद्ध प्रत्येकी दोन सामने जिंकले. पेगुलाने ऑस्ट्रियाच्या ग्रेबहेरचा 6-1,6-3 असा पराभव केला. या विजयामुळे अमेरिकेने ऑस्ट्रायावर 3-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या गॉफ आणि मॅकनेली यांनी ऑस्ट्रीयाच्या क्रेयुस आणि क्लेफनर यांचा 6-1, 6-4 असा पराभव केला. पेगुलाने शुक्रवारी या लढतीतील आपला सलामीचा सामना जिंकला होता. या स्पर्धेत 2022 साली स्वीसने विजेतेपद पटकावले होते. आता फ्रान्स, स्पेन, झेक प्रजासत्ताक, कझाकस्तान, जर्मनी, कॅनडा व इटली यांनीही अंतिम फेरी (फायनल्स) गाठली आहे. कॅनडाच्या बेल्जियमचा 3-2 असा पराभव करत तर कझाकस्तानने पोलंडचा 3-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अमेरिकेने आतापर्यंत विक्रमी 18 वेळा बिलि जिन किंग चषक पटकावला असून आता हा संघ विक्रमी 19 व्या वेळा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
ताश्कंदमध्ये झालेल्या 2023 च्या बिली जिन किंग चषक आशिया ओशेनिया गट 1 मधील लढतीत भारताने द. कोरियाचा 2-1 असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत 5 पैकी 2 लढती जिंकून गट 1 मध्ये चौथे स्थान मिळवले आहे.









