2014 मध्ये होते सिंचन मंत्री
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळी काँग्रेसच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य नारायण प्रसाद सऊद हे नेपाळचे नवे विदेशमंत्री झाले आहेत. सऊद हे यापूर्वी 2014 मध्ये सुशील कोईराला यांच्या सरकारमध्ये सिंचनमंत्री होते. तर मागील दीड महिन्यापासून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे विदेश मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत हेते.
सत्तारुढ पक्षामधील वादामुळे मंत्रिमंडळातील अनेक पदे अद्याप रिक्त आहेत. पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड आणि नेपाळी काँग्रेस अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांच्यात नवे विदेशमंत्री म्हणून सऊन यांना नियुक्त करण्यावर सहमती झाली होती. 31 मार्च रोजी देउबा यांचा पक्ष नेपाळी काँग्रेसमधील 4 नेत्यांना मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले होते. तर सत्तारुढ आघाडीतील पक्षांदरम्यान झालेल्या करारानुसार मंत्रिमंडळात नेपाळी काँग्रेसला 8 मंत्रिपदे मिळणार आहेत. प्रचंड यांनी माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यावर नेपाळी काँग्रेसच्या साथीने सत्ता टिकविली होती.









