राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नसल्याचे सांगून जरी कोणत्याही आमदाराने वैयक्तिकरित्या असा निर्णय घेतला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीही भाजपबरोबर जाणार नसल्याची खात्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहीती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
राज्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रभावी नेते अजित पवार सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी पक्षाशी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या येत असताना खासदार राऊत यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र सामनामधील ‘रोखठोक’ या साप्ताहिक स्तंभात आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवरिल शिवसेनेचा वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अशा प्रकारच्या शक्यतांना निराधार सांगून रात्री केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची मुंबईत भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला.
आपल्या स्तंभात लिहीताना खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला आहे कि, “मंगळवारी झालेल्या भेटीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना कोणीही भाजपमध्ये जाण्यास इच्छित नसल्याचे सांगितले. मात्र, पवार कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. पक्ष सोडण्याचा वैयक्तिक निर्णय कोणी घेत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण पक्ष म्हणून आम्ही कधीही भाजपसोबत जाणार नाही.” अशी खात्री सरद पवार यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.