ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्ताधाऱ्यांकडून दबाव टाकून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हे कदापी शक्य होणार नाही. उलट शिंदे-फडणवीस सरकारचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना म्हटले आहे. मिटकरी यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिटकरी म्हणाले, आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या. लवकरच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेतून पायउतार होईल. या सरकारचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. दबाव टाकून राष्ट्रवादी फुटणार नाही. अजितदादा हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
मिटकरींचं ट्विटही चर्चेत
“भाजपाकडून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झाला आहे हे आता एकनाथ शिंदे यांना कळून चुकलंय. अशी माहिती मला शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राने दिली आहे.” मिटकरी यांच्या या ट्विटचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.








