प्रतिनिधी/ बेळगाव
कित्तूरजवळ जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आलेला बेकायदा दारूसाठा अबकारी विभागाने शनिवारी जप्त केला आहे. पोलिसांनीही वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून बेकायदा दारूसाठा, दागिने, गांजा जप्त केला आहे.
अबकारी अधीक्षकांच्या अखत्यारित विशेष पथकाने कित्तूरजवळील लिंगदहळ्ळी जंगल परिसरात शनिवारी दुपारी 259.20 लिटर बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. त्याची किंमत 3 लाख 60 हजार रुपयांइतकी होते. आरोपी फरारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान गोकाक ग्रामीण पोलिसांनी 60 लिटर बेकायदा दारू व साडेपाच किलो गांजा जप्त केला आहे. रायबाग पोलिसांनी भिरडी येथे 32 लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. रायबाग पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छापे वाढविण्यात आले आहेत.









