Apurva Nemalekar : बिग बॉस मराठी ४ ची उपविजेती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाचा छोटा भाऊ ओमी याचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन झाल आहे. अपूर्वाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. सोबतच भावाचे आणि तिचे फोटो शेअर केले आहेत.तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. पण प्रेम कधीच मरत नाही. तू माझ्या मनात,हृदयात कायमच असशील.माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
“माझा प्रिय भाऊ ओमी,
आयुष्यात कधी कधी नुकसान, तोटा होत असतो. यात आपण काहीही बदल करु शकत नाही. पण तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. खरं सागूं तर मी तुला निरोप द्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायलाही तयार नव्हते. एक दिवस किंवा एका सेकंदसाठी मी काहीही द्यायला तयार होते. पण मृत्यूबद्दलचं एक सत्य म्हणजे, प्रेम कधीच मरत नाही, म्हणून मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे. काही नातेसंबंध हे कधीच तोडता येत नाही.
कारण जरी शारीरिकदृष्ट्या तू इथे नसला तरी तुझे हृदय इथेच असेल, ते माझ्याजवळ कायमच राहील. तू नेहमीच माझ्याबरोबर असशील. आपण पुन्हा कधीतरी नक्कीच भेटू आणि तिथे आपल्याला वेळ किंवा जागाही वेगळं करु शकत नाही. पण त्या दिवसापर्यंत तुझे हृदय कायमच माझ्याबरोबर असेल. काही हृदयं ही फक्त एकत्र येतात आणि त्यात काहीच बदल होत नाही. माझे तुझ्यावर प्रेम होते, प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल. तू माझ्या मनात, हृदयात कायमच असशील. माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू. Rest in peace”, अशी पोस्ट अपूर्वा नेमळेकरने केली आहे.
अपूर्वाच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. तर काहींनी तिचे कौतुक करत सात्वन केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, अपूर्वा तू खरच खूप धाडसी मुलगी आहेस ग तुझ्या आयुष्यात येणारे इतकी भयानक वादळ तू पायाशी ठेवून जगत आहेस तेही अगदी आनंदाने तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे खरंच मी तुझ्या प्रेमात तर होतेच तुझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे पण आज तुझ्याबद्दल रिस्पेक्टही खूप वाढला… नीट काळजी घे सगळी परिस्थिती हाताळशीलच तू नीट विश्वास आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









