शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं उदघाटन
सावंतवाडी / प्रतिनिधी
Swami Samarth Samagar Darshan Photo Exhibition in Vitthal Temple!
सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात स्वामी समर्थ समग्र दर्शन छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करून करण्यात आले. यावेळी श्री केसरकर म्हणाले स्वामी समर्थ यांचे हे छायाचित्र प्रदर्शन या माध्यमातून तुम्ही स्वामींचे दर्शन घ्या आणि खऱ्या अर्थाने तुमच्या मनात जर खरी परमेश्वराची भक्ती असेल तर तुम्हाला परमेश्वर साथ देत असतो. मला याचा अनेकदा अनुभव आला आहे . हे प्रदर्शन खरोखरच उत्कृष्ट आहे. अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. यावेळी हे प्रदर्शन भरवणारे संजय वेंगुर्लेकर यांचा विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन श्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामी समर्थांची दुर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली असून 125 अशी आगळीवेगळी छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. आज शनिवार व उद्या रविवार अशा दोन दिवस हे प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालणार आहे . या प्रदर्शनाला विठ्ठल मंदिर समितीचे नंदू शिरोडकर , आबा केसरकर., भारती मोरे, राजन पोकळे, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर ,सौ धारगळकर ,सौ गीता सुकी ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे ,अशोक दळवी, रामानंद शिरोडकर, सचिन वालावलकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.