वृत्तसंस्था/ माँटे कार्लो (मोनॅको)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटीने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याप्रमाणे इटलीच्या सिनेरने पुरुष एकेरीच्या शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. दुखापतीमुळे इटलीच्या मॅटेव बेरेटेनीने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात लॉरेन्झो मुसेटीने जोकोविचचा 4-6, 7-5, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. या पराभवामुळे जाकोविचचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून तो आता पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या सिपेस्का खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहे.
दुसऱ्या एका सामन्यात इटलीच्या सातव्या मानांकित जेनिक सिनेरने हुरकेजचा 3-6, 7-6(8-6), 6-1 असा पराभव केला. रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवताना कॅचेनोव्हचे आव्हान 7-6(7-4), 6-2 आ संपुष्टात आणले. या स्पर्धेत सहभागी झालेला इटलीचा बेरेटेनी याने पोटदुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. बेरेटेनीच्या माघारीमुळे रुमानियाच्या रुनेला पुढे चाल मिळाली आहे.









