वृत्तसंस्था/ मोहाली
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाविरुद्ध खेळताना गुजरात जायंट्सला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाख रुपये दंड जाहीर करण्यात आला आहे.
आयपीएलच्या स्पर्धा नियमानुसार प्रत्येक सामना 3 तास 20 मिनिटात संपणे आवश्यक आहे. पण सध्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघासमोर षटकांची गती न राखता येण्याची समस्या निर्माण झाली आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील काही सामने चार तासापेक्षा अधिक वेळ खेळले गेले आहेत. पंजाब विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 गड्यांनी आरामात विजय मिळवला होता. या विजयामुळे विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे.









