वृत्तसंस्था
ताश्कंद (उझ्बेक) येथे सुरू असलेल्या बिलि जिन किंग चषक सांघिक आशियाई ओसेनिया गट 1 मधील टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिस संघाला तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात चीनने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.
या लढतीतील सलामीच्या एकेरी सामन्यात चीनच्या जियांगने भारताच्या रुतुजा भोसलेचा 6-3, 7-5, दुसऱ्या एकेरी सामन्यात चीनच्या युयानने अंकित रैनाचा 7-5, 6-1 असा पराभव केला. त्यानंतर महिला दुहेरीच्या सामन्यात चीनच्या जियांग आणि यांग यांनी भारताच्या श्रीवल्ली रश्मिका आणि वैदेही चौधरी यांचा 6-0, 6-1 असा पराभव केला. या लढतीत चीनने तिन्ही सामने जिंकून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या गटात भारताला तिसऱ्या स्थानावर आहे.. आशिया ओसेनिया गट 1 मध्ये जपान पहिल्या स्थानावर असून चीन दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारताची या स्पर्धेतील पुढील लढत जपानबरोबर होणार आहे.









