शिलाँग / वृत्तसंस्था
मेघालयचे माजी आमदार ज्युलियस दोरफांग यांना एका युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मेघालय उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द करण्यास नकार देऊन कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी राज्य सरकारने या युवतीला 20 लाख रुपयांची भरपाई द्यावी असाही आदेश दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेली 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा योग्य असून ती कमी करण्याचे किंवा रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही. दोरफांग यांना ऑगस्ट 2021 मध्ये पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली होती.









