मुंबई
शेअर बाजारातील मेडिको रेमेडिज या मल्टिबॅगर समभागाने गुंतवणूकदारांना दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दमदार परतावा दिला आहे. सदरच्या अवधीमध्ये समभाग तब्बल 1600 टक्के इतका वाढला आहे. मेडिको रेमेडिजचे समभाग 11 एप्रिल 2023 रोजी 89 रुपयांवर पोहोचले होते. ही 52 आठवड्यानंतर उच्चांकी कामगिरी ठरली होती. गुरुवारी या समभागाचा भाव 86 रुपयांवर कार्यरत होता. वर्ष 2023 मध्ये 35 टक्के इतका समभाग वधारला आहे.
बाजार भांडवल 730 कोटी रुपयांवर
सध्याला या कंपनीचे बाजार भांडवल 730 कोटी रुपये इतके राहिले आहे. एप्रिल 2021 मध्ये 4.86 रुपये इतका असणारा समभागाचा भाव वर्षभरात 260 टक्के वाढला आहे आणि गेल्या सहा महिन्यांमध्ये 200 टक्के वर चढला आहे.









