खंडेराजुरी/ वार्ताहर-
Miraj Weather Update : मिरज तालुक्यातील भोसे,खंडेराजुरी ,मालगाव ,सोनी सलगरे परिसरात अवकाळी पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुन्हा द्राक्ष व बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष व बेदाणा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच शुक्रवारी दुपारनंतर मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात वारा सुरू होता. तसेच अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने अनेक बेदाणा शेड वरील बेदाणा भिजला आहे तर वाऱ्यामुळे बेदाणा शेड उडून गेले आहेत.आधीच शेतकरी आर्थिक संपन्न संकटात सापडला असताना अवकाळी पावसाने बेदाणा, द्राक्षासह शेतीमालाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे .
द्राक्षाचा दर चार किलो पेटीस 80 ते 110 रुपये असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणे उत्पादनाकडे वळला आहे. पण दोन वेळा अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेड वरील बेदाणा काळा पडून कलर चॉकलेटी झाल्याने दर कमी मिळत आहे. तसेच मार्केटिंग चाही दर कमी आला आहे. उत्पादन होऊनही निसर्गाच्या संकटामुळे मिरज पूर्व भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








