पुणे / प्रतिनिधी :
अजित पवार हे माझ्या पक्षात आल्यावर मला खूप आनंद होईल आणि त्यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी अजित पवार यांना दिली.
अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली अजित पवार हे काम करीत आहेत. शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अनेक पदे देऊन अनेक वेळा न्याय देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मध्यंतरी अजित पवार हे आजारी होते. त्यामुळे त्यांचा फोन बंद असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, पण अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली मैत्री असून, त्या दोघांनी यापूर्वी एकत्रित शपथ घेतली आहे.
आदित्य ठाकरेंचा आरोप चुकीचा
एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहेत. ते रडणार नाहीत. एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उध्दव ठाकरेंना कंटाळून ते गेले. आदित्य ठाकरेंचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. एकनाथ शिंदे रडले म्हणून उध्दव ठाकरे पडले, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला आहे.








