प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
Guardian Minister Ravindra Chavan’s goodwill visit to Tarun Bharat Samvad Office!
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज आपल्या जिल्हा दौरा दरम्यान तरुण भारत संवाद च्या ओरोस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी तरुण भारत च्या वतीने संपादक शेखर सामंत यांनी त्यांचे स्वागत केले.
अवकाळी पावसाने शेती-बागायतीच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व जिल्हयात विविध खात्यांच्या बैठकांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी व चालू घडामोडींची माहिती घेण्या करीता ते सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान ते ओरोस येथे आले असतांना त्यांनी ओरोस येथील तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
तरुण भारत च्या पत्रकारीतेची आणि विश्वासहर्तेची प्रसंसा करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हयातील विविध घडामोडींबाबत संपादक शेखर सामंत यांच्याकडून माहिती जाणून घेतली.या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, महेश सारंग, अनंतराज पाटकर आदी उपस्थित होते. तर तरुण भारतच्या बतीने सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी संदीप गावडे, ओरोस प्रतिनिधी दत्तप्रसाद वालावलकर, जाहिरात विभाग प्रमुख राजेश पावसकर, एच. आर. प्रमुख संतोष खानोलकर, लेआऊट आर्टिस्ट रविकीरण परब, कंप्यूटर ऑपरेटर दिनेश गोसावी, कसाल वार्ताहर विनोद परब, छायाचित्रकार सतीश हरमलकर, संजय परब आदी उपस्थित होते.









