
पणजी : गोव्यात राज्यात सर्वत्रच रस्ताकामे, सौंदर्यीकरण तसेच कचरा व्यवस्थापनासंबंधीची कामांनी आता योग्य दिशा पकडली आहे. जी20 परिषदेच्या बैठकांच्या आाsजनांमुळे या कामांना आता स्मार्ट सिटी (आयपीएससीडीएल), वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ या विभागांच्या माध्यमातून चांगली गती मिळाली आहे. आता काही दिवसांतच ही कामे पूर्ण होताच नागरिकांची चिंता व रोषही कमी होईल. या कामांमुळे पणजी शहराचे रूप पालटून गेले असून सुंदर, रमणीय पणजी शहर 17 ते 19 एप्रिल होण्राया पहिल्या जी20 बैठकीच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे. पणजी महापालिकेद्वारे हाती घेतलेल्या कामांमध्ये बागा तसेच रस्त्याकडील बागकामांची देखभाल-दुऊस्ती तसेच लँडस्कॅप विकासाची कामे यांचा समावेश आहे. डी.बी मार्ग तसेच डॉ. जॅक डि सिकेरा मार्गावरील खुला परिसर तसेच दुभाजक यांचाही विकास करण्यात आला आहे. चैत्रपालवीबरोबरच लँडस्केप हॉर्टिकल्चरिस्ट आणि वास्तुरचनाकार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामांमुळे पणजी शहरास नवा साज चढल्याने सारे शहर जणू हिरवाईचा शालू परिधान केल्यासारखे नटले आहे. शहरातील सर्व दिशाफलक व माहितीफलक यांचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे. कचरापेट्याही ठिकाठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यास सज्ज आहेत. तसेच पावसाळी काळात आपत्कालीन स्थितीचे प्रभावीपणे नियोजन अंमलबजावणीसाठी सक्षम पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नियुक्त कर्मचारी गणवेश तसेच फ्लुरोसंट जॅकेट परिधान करून स्वच्छताकामे करण्यासाठी सज्ज आहेत. रोज रात्री रस्ता तसेच पदपथांची साफसफाई केली जाणार असून तर ठराविक दिवसांनंतर रस्त्यांवरील काळे डागही काढले जाणार आहेत.

ठआधीपासूनच हाती घेण्यात आलेल्या साधनसुविधांच्या कामांची गती वाढवणे हे सोपे नसते. तसेच या कामांसाठी नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागला. पण आता या कामांचे चांगले परिणाम दिसून येतील आणि संपूर्ण गोव्यास याचा लाभ मिळेल. अशा प्रकारे साधनसुविधांच्या विकासाची गतिमान कामे 2003 साली हाती घेण्यात आली होती जेव्हा गोव्याच प्रथमच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन होणार होते,ठअशी प्रतिक्रिया जी-20साठीचे नोडल अधिकारी तसेच इफ्फी-2003 सालच्या कामांचाही प्रत्यक्ष अनुभव असलेले संजित रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केली. श्री. रॉड्रिग्ज पुढे म्हणाले की, जी-20 बैठकांच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाला चालना देण्याच्या विचाराने सर्वच खात्यांनी, यंत्रणांनी कंबर कसून हा पायाभूत विकास साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
सार्वजनिक बांधकाम खात्यानेही सकारात्मक भूमिका घेत महत्वाच्या कामांना गती दिली. रस्त्याची गुणवत्ता हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरत असतो. यावेळी मात्र रस्ताकामांना गती व प्राधान्य दिले गेले आणि यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. दिवजा सर्कल ते जुने गोवा आणि जुने गोवे चर्च भोवतालचा रिंगरोड येथील रस्त्यांचे सक्षमीकरण करत प्रवाससुलभता वाढवली आहे,ठअशी माहिती जी-20 साठीचे विशेष अधिकारी (सार्वजनिक कामे) भूषण सावईकर यांनी दिली. कदंब बसस्थानक ते मिरामार सर्कल या पट्टयातील डी.बी. मार्ग, पोर्तुगीज वकिलाती ते भंडारे हॉस्पिटल, अल्फोन्सो गेस्ट हाऊस ते म्हामई कामत, सेंट फ्रान्सिस चॅपेल ते मळा झरा, फोन्तेन्हाइश-मळा येथील सर्व रस्ते, मुख्य टपाल कार्यालय ते लवंदे हाऊस या रस्त्यांचे डांबरीकरण (हॉटमिक्स) तसेच सुधारणाकाम करण्यात आले. तसेच या रस्त्यांचे सुशोभिकरण आणि रस्ता दुभाजकांचे रंगकामही करण्यात आले. रस्त्याचे दुभाजक तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, पथबेटांचे व रस्तावर्तुळांचे सौंदर्यीकरण यासह शहरातील साधनसुविधांचा विकास व सुशोभिकरणासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहेत. रस्ता दुभाजकांचे दुऊस्तीकरण व रंगकाम करून संपूर्ण शहरास नवे रूप मिळाले आहे. रस्ते तसेच रस्तावर्तुळांचे रंगकाम करण्याबरोबरच काही सार्वजनिक भिंतीचेही शिल्पकलांच्या माध्यमातून सुशोभिकरण केले जाणार आहे.
निमंत्रितांद्वारे वापरले जाणारे रस्त्यांवर या सुविधाविकासांसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून दुभाजकांचे रंगकाम सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण होताच शहराचे रूपडे आणखी पालटेल असा अधिक्रायांना विश्वास आहे. बैठकांसाठी निमंत्रित केलेल्या प्रतिनिधींच्या पार्किंग गरजा ओळखून प्रशासनाने पाटो येथील बहुमजली वाहनतळ तसेच गोवा विद्यापीठ मैदान आरक्षित केले आहे. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने रस्त्यांचे स्वच्छताकाम हाती घेतले आहे. तर ग्रामपंचायती आणि पालिका प्रशासनांनाही आपापल्या क्षेत्रांतील स्वच्छता कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक ठिकाणी रस्त्यांवरील वीजखांब व उपकरणे बदलून आधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणे बसवण्यात आली आहेत. दोनापावला ते गोवा विद्यापीठ रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरण्राया ठिकाणांचे रस्ता ऊंदीकरण केले जाणार असून या ठिकाणीही वाहतूकसुलभता अनुभवास येईल. त्याचबरोबर शहरातील संस्कृती तसेच वास्तुकलेचा श्रीमंत वारशाचे दर्शन निमंत्रितांना घडवण्याच्या उद्देशाने वारसामार्ग तयार करण्याचाही विचार विकासधुरीण करत आहेत. शहरांतील पायाभूत सुविधा ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्ना या वारसामार्गातून होणार असून यामुळे निमंत्रित पाहुण्यांना गोव्यातील श्रीमंत वारशाचा अनुभव आपल्यासोबत नेता येईल आणि त्यांना परत परत गोव्यास येण्यास आकर्षित करत राहील असा विश्वास विकासधुरिणांना आहे. अटल सेतूखालील केटीसी सर्कल येथील वाहतूक व्यवस्था सुधारणे व सुलभ करणे, सांगोल्डा जंक्शन ते मांडवी पूल येथील राष्ट्रीय महामार्ग-17 (नवा एनएट-66) रस्ता, दाबोळी विमानतळजवळ, तसेच वेर्णा, कांसावली आणि वेळसांव येथील कामांनाही आता प्राधान्य देणे आवश्यक आहे.
कूट-डि-ओतेरोमधील डी.बी मार्गाजवळील विहारमार्गाचे हल्लीस पदपथ विकासासह सुशोभिकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथ विकास करण्यात आल्यामुळे जास्त रहदारी असलेल्या भागात पादच्रायांना चालण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी जागा उपलब्ध झाली आहे. शहरातील महत्वाची वारसास्थळांना सुलभपणे जोडण्बरोबरच या परिसराचे सौंदर्य वाढवण्याचे कामही या प्रोमिनेडद्वारे होत आहे. या व्यतिरिक्त, एक नवीन पूल पूर्ण झाला आहे, जो प्रॉमेनेडला डी.बी. मार्गाला जोडणारा आहे, ज्यामुळे परिसराची सुलभता आणखी वाढेल. तसेच प्रोमिनेड ते डी.बी. मार्ग जोडण्राया नव्या पुलाचेही काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होणार आहे.
जुने गोवा ते मेरशी सर्कलपर्यंतच्या पट्ट्यातील सध्याच्या बांधकामांना रस्ता सुरक्षा फर्निचर आणि इलास्टोमेरिक पेंटिंगचे काम हाती घेण्यात आले आहे, तर क्रॅश-बॅरियरची दुऊस्ती किंवा आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच आता एनएच-78 मार्गावरील रस्ता सुरक्षा फलकही स्पष्ट व सहजपणे दिसतील अशा प्रकारे लावण्यात आल्याने या भागातील अपघात कमी टाळण्यासाठी ही उपाययोजना मोलाची ठरणार आहे. अटल सेतू पुलाखालून पार्किंग सुविधा उभारण्यात आल्यामुळे पणजी शहरातील आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक गर्दी कमी करण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. फोंतेनाइश, 31 जानेवारी मार्ग तसेच शहरातील अनेक भागांतील जुन्या इमारतींचे रूप रंगकामाद्वारे पालटवण्यात आले आहे. वीज विभागाद्वारे डिसेंबर 2022 पासून हाती घेतलेली कामे जवळपास पूर्ण केली आहेत. पणजी शहर तसेच आसपासच्या परिसरास निर्दोष वीजपुरवठा करणे आणि प्रकाशयोजना विकास हे या कामांचे मुख्य उद्देश होते. जी20 बैठकांच्या माध्यमातून विशेष लक्ष गरजेच्या असलेली कामे आता पूर्णत्वाकडे पोचत आहेत. यामुळे गोव्यात विकसित साधनसुविधांबरोबच प्रभावी व कायमस्वरूपी वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
फोंन्तेनहास, मळा, साओ टोम सह पणजीतील तीन प्रभागांमधील वारसास्थळांचे रंगकाम व सुशोभीकरण करत पणजी शहर अधिक सुंदर व आकर्षक करण्याचे काम गोवा शासनाने राबवले आहे. या उपक्रमामुळे गोव्यातील सांस्कृतिक वारशा तसेच पर्यटन विकासाला प्रोत्साहन मिळणार असून शहरातील रमणीय स्थळांनाही रंगकामाच्या माध्यमातून नवा साज मिळणार आहे. चर्च, वसाहतकाळातील घरे, इमारती यांच्यासह विविध वारसा स्थळांच्या रंगकामाच्या माध्यमातून शहरास एक नवे आकर्षक रूप दिले जाणार आहे. वारसा स्थळांबरोबरच फोन्तेनाइश ते पणजी शहर दरम्यानचा आर. इमिडिओ ग्रासिया रोड प्रमुख सार्वजनिक ठिकाणी भिंतींचे रंगकाम तसेच आकर्षक वास्तुकला करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. ही चित्रे केवळ शहराची चैतन्य वाढवणार नाहीत तर शहराच्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्राया अभ्यागतांसाठी एक तल्लीन करणारा अनुभवही निर्माण करतील. जी-20 बैठकीसाठी भेट देण्राया प्रतिनिधींसाठी आनंददायी वातावरण निर्माण करण्याबरोबरच पणजी शहरातील वारसास्थळ वास्तूंचे संवर्धन करणे हा यामागचा उद्देश आहे. दर्शनी भागाच्या रंगकामामुळे इमारतींचे हवामानामुळे होणारे नुकसान टाळणे व संरक्षण करणे, त्यांचे आर्युमान वाढवणे याबरोबरच गोव्याच्या सांस्कृतिक वारसा प्रदीर्घ काळ राखण्याचे काम निश्चित होणार आहे. ग्रुप ऑफ ट्वेंटी किंवा जी20 हा जगातील सर्वात शक्तिशाली 19 अर्थव्यवस्था आणि युरोपी महासंघ यांचा समावेश असलेला आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचा प्रमुख मंच आहे. जी20 गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, हवामानातील बदलांमुळे होणारे स्थलांतर आणि शाश्वत विकासाशी संबंधित असलेल्या प्रमुख जागतिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपीय महासंघ (ईयु) या देशांचा समावेश जी20मध्ये आहे. अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.









