जळगाव / प्रतिनिधी :
मुस्लीम समाजासाठी भाजपने जेवढे योगदान दिले, तेवढे योगदान काँग्रेसने कधीही दिलेले नाही. काँग्रेसने केवळ मतांसाठी मुस्लीम समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
जळगावात पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने मुस्लीम समाजाच्च्या विरोधात कधीही राजकारण केले नाही. भारतावर प्रेम करणारा येथील मुस्लीम समाज असून, त्याला आज शिक्षण, आरोग्य, रोजगार यांची गरज आहे. मात्र, काही नेत्यांनी या समाजाला भडकवण्याचे काम केले तर काहींनी हिंदुत्ववादी व्यवस्थेच्या विरोधात निधी उपलब्ध करून देतात, याकडे त्यांचे लक्ष वेधले. भाजप मुस्लीम विरोधी असल्याचा जाणीवपूर्वक प्रचार केला जातो. पण भाजपने मुस्लीम समाजासाठी जेवढे योगदान दिले तेवढे काँग्रेसने कधीही दिले नाही. केवळ मतांसाठी संभ्रम निर्माण करण्याचे काम केले.
चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशिद संदर्भातील विधानावर बोलताना ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे ते विधान मी ऐकलेले नाही, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकेल ते पक्षाचे मत नाही.








