यंगून
म्यानमार सैन्याच्या हवाई हल्ल्यांमध्ये मंगळवारी 50 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 15 महिला आणि अनेक मुलांचा समावेश आहे. सैन्याने हे हवाई हल्ले बंडखोरांचे केंद्र मानले जाणाऱया पाजीगी भागात केले आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तापालटानंतरचा सैन्याचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.









