श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्हय़ात सुरक्षा दलांनी मंगळवारी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी मॉडय़ूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदम्यान दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस, राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने पट्टन भागात ही कारवाई केली आहे. फारुक अहमद पर्रा आणि साइमा बशीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांकडून एक पिस्तुल, आयईडी आणि रिमोट कंट्रोल उपकरण हस्तगत करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात असून यातून त्यांच्या अन्य साथीदारांबद्दल माहिती मिळविली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









