जुळय़ा मुलांची झाली आई
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हिलरी स्वँकने स्वतःच्या चाहत्यांना खूषखबर दिली आहे. अभिनेत्री हिलरीने अलिकडेच जुळय़ा मुलांना जन्म दिला आहे. हिलरीच्या मातृत्वाची माहिती कळताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हिलरीने स्वतःच्या दोन्ही अपत्यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

वयाच्या 48 व्या वर्षी हिलरीने जुळय़ांना जन्म दिला आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या आनंदासह वेदनादायी अनुभवही शेअर केला आहे. परंतु या मोठय़ा आनंदासमोर या वेदना काहीच नसल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने डिसेंबर 2022 मध्ये नाताळावेळी स्वतःच्या गरोदरपणाची माहिती दिली होती.
हिलरी स्वँकच्या पोस्टवर बिपाशा बासूपासुन हॉलिवूड स्टार लिंडसे लोहानने शुभेच्छा दिल्या आहेत. हिलरीने फिलिप स्नाइडरसोबत 2018 मध्ये विवाह केला होता. हिलरी स्वँकची वेबसीरिज ‘अलास्का डेली’ अलिकडेच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. या वेबसीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. याचबरोबर हिलरी अनेक चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते.









