नवी दिल्ली
एमजी मोटर्स इंडिया आगामी काळामध्ये आपली नवी इलेक्ट्रिक कार कॉमेट सादर करणार असून त्या संदर्भातला टीझर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यातून काही माहिती प्रसारीत करण्यात आली आहे. सदरच्या टीझरमध्ये गाडीच्या अंतर्गत भागाची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. गाडीचे स्टेअरिंग अॅपल आयपॉडने प्रेरित होऊन डिझाईन करण्यात आले आहे. ड्युअल स्क्रीनसह 10.25 इंचाचे दोन स्क्रिन गाडीत असणार आहेत. अँड्रॉईड ऑटो, अॅपल कार प्लेट, त्याचप्रमाणे की लेस एंट्री यासारख्या इतर सुविधाही यामध्ये असतील असे बोलले जात आहे. सध्याला ही कार जागतिक बाजारामध्ये सादर केली गेली आहे. टीगोर इव्ही आणि सिट्रोजन इसी 3 या कारपेक्षा कॉमेटचा आकार कमी असणार असल्याचे बोलले जात आहे. सदरच्या गाडीमध्ये चार जण बसतील अशी सोय असेल. या गाडीला 25 एडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी व 38 बीएचपीची मोटर असणार आहे. एका चार्जनंतर ही गाडी 150 किलो मीटरचे अंतर कापू शकणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 10 लाखाच्या आत या गाडीची किंमत असू शकते, असेही म्हटले जात आहे.









