उन्हाळ्यात तहान घालवण्यासाठी लोक फ्रीजमधील थंड पाणी पितात. थंड पाणी पिऊन तुमची तहान तर भागते पण तुम्हाला माहीत आहे का,थंड पाणीतुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. पाणी जितके थंड असेल तितके अधिक हानिकारक परिणाम होतात. आज आपण थंड पाणी पिणे का टाळावे हे जाणून घेऊयात.
थंड पाणीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे पचनात अडथळा येतो. हे पचन दरम्यान पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणते. हे आपल्या शरीराचे तापमान आणि पाण्याचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याने शरीराचे लक्ष पचनाकडे वळवते, ज्यामुळे पाणी कमी होऊ शकते आणि आपल्याला डिहायड्रेट वाटू शकते. म्हणूनच नेहमी रुम टेम्परेचरवर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
बऱ्याचदा थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे आणि सर्दी होण्याची शक्यता वाढते. जेवल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने कफाचा त्रास होतो.त्यामुळे शक्यतो अतिगार पाणी पिणे टाळावं.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही जेवणानंतर लगेच थंड पाणी प्याल तर ते तुम्ही खाल्लेल्या अन्नातील चरबी घट्ट होईल, ज्यामुळे तुमच्या शरीराला अतिरिक्त चरबी जाळणे कठीण होईल. अशावेळी जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही.
(वरील बातमी ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









