20 हजार भाविकांना शिस्तबद्धरीत्या महाप्रसादाचे वाटप
बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 20 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला. वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरमध्ये यात्रोत्सव पार पडल्यानंतर सासनकाठीसह गेलेल्या 14 बैलगाड्या सोमवारी सकाळी शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरमध्ये परतल्या. यावेळी मोठ्या उत्साहाने भाविकांनी सासनकाठी आणि भाविकांचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री जोतिबा मंदिरामध्ये पूजा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जोतिबा मंदिराचे ट्रस्टी तसेच चव्हाट गल्ली येथील सर्व भाविकांनी या महाप्रसादासाठी नियोजन केले. सर्वांना शिस्तबद्धरीत्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.









