वृत्तसंस्था/ लॉस एंजेल्स
टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने विद्यमान विजेत्या स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकचा पराभव करून येथे झालेल्या डब्ल्यूटीए चार्ल्सस्टन ओपन क्ले कोर्ट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया जेबॉरने गेल्या वर्षी अंतिम फेरीत झालेल्या पराभवाची परतफेड करताना बेन्सिकवर 7-6 (8-6), 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. बेन्सिकला पावसामुळे अर्धवट राहिलेला उपांत्य सामना आधी पूर्ण करावा लागला. तिने या लढतीत जेसिका पेगुलाचा 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. हा सामना झाल्यानंतर 30 मिनिटांनी तिला अंतिम सामना खेळावा लागला. चौथ्या मॅचपॉईंटवर जेबॉरने विजय मिळवित कारकिर्दीतील चौथे अजिंक्यपद मिळविले.









