कोविड लाटांनी तोंड पोळल्यामुळे इलि-सारी-इन्फ्लूएंझा आजारांच्या पॉझिटीव्ह नमुन्यांचे जिनॉम करण्याचे केंद्राचे आदेश असून जिनॉम नमुन्यांची संख्या वाढवा हा उप-आदेशही दिला गेला आहे. इन्फ्लुएंझा सदृश आजार जिनॉम सिक्वेन्सिंग परिक्षणाखाली आणण्याची हीच वेळ का? इन्फ्लुएंझा सदृश आजाराच्या पॉझिटीव्ह नमुन्यांचे जिनॉम चाचणी करण्याचा का घाट घातला जात आहे? शिवाय जिनॉम सिक्वेन्सिंग चाचणीतील तीव्रता आताच का वाढली? जागतिक आरोग्य संघटना एक्सबीबी1.5 सह इतर सहा ओमिक्रॉन वंशीय विषाणूंच्या मागे लागली असून अचानक वाढणाऱ्या कोविड ऊग्णसंख्येचे मूळ कारण शोधले जात आहे. म्हणजेच युद्ध अद्याप सुऊच असल्याचे सद्य स्थितीवऊन दिसून येत आहे.
तसे पाहिल्यास इलि-सारी-इन्फ्लूएंझा हे आजार पारंपारिक असून परिचयाचे झाले आहेत. या आजाराच्या नमुन्यांचे जिनॉम सिक्वेसिंग परीक्षणही केले जात होते. मात्र कोविड पॉझिटीव्ह नमुन्याच्या जिनॉमला देण्यात येणारे महत्त्व इलि-सारी-इन्फ्लूएंझाच्या जिनॉमला नव्हते. आता स्थिती बदलली असून जिनॉम परिक्षणात तीव्रता वाढली आहे. इन्फ्लुएंझा सदृश सर्व आजार
जिनॉम सिक्वेन्सिंग परिक्षणाखाली आणले आहेत. अठरा राज्यांचे आरोग्य मंत्री आणि प्रमुख सचिवांची पेंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी झालेली बैठक नेमकं तेच सांगते. नुकत्याच राष्ट्रीय आरोग्य बैठकीत अशा पॉझिटीव्ह ऊग्णांचे नमुने देखील जिनॉम तपासणीसाठी द्यावेत या आदेशातून कोविडची वाढती ऊग्णसंख्या गंभीरता आणत आहे. कोविड19 आणि इन्फ्लूएंझाच्या ऊग्णांसह इलि आणि सारीच्या ऊग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यावर भर देण्यात येत आहेत. राज्याचे कोविड तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इलि-सारी-इन्फ्लूएंझाचे जिनॉम सिक्वेसिंग परीक्षण ही गरज असल्याचे सांगत त्यामागील महत्त्व स्पष्ट केले. इलि-सारी-इन्फ्लूएंझा
पॉझिटिव्ह नमुन्यांचे देखील यापूर्वी जिनॉम होत होते. मात्र मार्च मध्यावधी पासून वाढती ऊग्णसंख्या पाहून विविध बदलणाऱ्या व्हेरिएंटचा पाठपुरावा करणे आवश्यक झाले आहे. हे मुंबई-महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभरात घडत असून कोविड आणि फ्ल्यू सदृश्य आजारांतील विषाणूंचे बदलते उपप्रकार समजून घेण्याची गरज आहे. त्यानुसार संबंधित नमुने
पॉझिटीव्ह आल्यास अशा पॉझिटीव्ह नमुन्यांचे
जीनॉम अनुक्रम ठरविण्यासाठी नमुने संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच संसर्ग कमी झाला असे म्हणत असतानाच जागतिक पातळीवर कोविडचा पाठपुरावा अद्याप संपलेला नाही. तसा तो स्थानिक पातळीवरही सुऊच आहे. जागतिक आरोग्य संघटना सध्या एक्सबीबी1.5 यासह इतर सहा कोविड उपप्रकारांचा शोध घेत आहे. राज्यात कोविड संख्या वाढत असताना देशात आणि जगातही वाढत आहे. हे सौम्य विषाणू उपप्रकार असले तरी देखील देशातील आठ राज्यांमध्ये कोविड ऊग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. कोविडला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाचे चित्र पाहताना देशात पहिल्या लसीकरणाचे 90 टक्पे यशस्वी पालन झाले. मात्र असे असले तरी बुस्टर डोसला टाळाटाळच झाली. ही टाळाटाळ आता पेंद्रांच्या आरोग्य अहवालातून समोर येत आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकसंख्येला त्यात ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यात लसीकरण वाढवणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान देशातील आठ राज्यांमध्ये कोविडचे ऊग्ण सतत वाढत असल्याचे समोर येत आहे. यात 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दर असलेल्या राज्यात महाराष्ट्र आहे. तसेच केरळ आणि दिल्लीत देखील 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दर आहे. अशा ठिकाणी कोविड वर्तणुकीचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. सरकारी यंत्रणेकडून कोविड वर्तणुकीबाबत जनजागफती मोहीम वाढविण्यावर भर दिला जात आहे. ऊग्णसंख्या वाढलीच तर ऊग्णालयीन सज्जता असावी याची चाचपणी करण्याचे आदेश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहेत. 10 एप्रिल आणि 11 एप्रिल अशी दोन दिवस आरोग्य यंत्रणांचे मॉकड्रिल करण्याचे ठरले. इलि-सारी-इन्फ्लूएंझासारख्या आजारांचे जिनॉम, आरोग्य यंत्रणेचे मॉकड्रिल यासारखे आदेश सरकारी यंत्रणेचा सावध पावित्रा दिसून येत आहे. त्याची कारणे कोविड उपप्रकारांमधून समोर येत आहेत. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना कोविडच्या विविध उपप्रकार विषाणूंचा बारकाईने शोध घेत आहे. यात प्रामुख्याने एक्सबीबी.1.5 असून इतर सहा प्रकारांमध्ये बीक्यू.1, बीए.2.75, सीएच.1.1, एक्सबीबी, एक्सबीएफ आणि एक्सबीबी.1.16 असे प्रकार आहेत. हे सर्व ओमिक्रॉनचे वंशीय असले तरी यांमध्ये आजाराची तीव्रता नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी सरकारी यंत्रणा कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून टेस्टिंग आणि जिनॉम क्रमनिर्धारण वाढविण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात एक्सबीबी.1.16 चा प्रसार 21.6 टक्के एवढा होता. तोच मार्च महिन्यात 35.8 टक्क्यांवर पोहचला होता. मात्र एक्सबीबी.1.16 बाधित ऊग्ण गंभीर स्थितीत जाण्याचे प्रमाण आणि त्यांच्या मफत्यूचे प्रमाण वाढल्याचे कुठेही दिसून आले नाही. तुर्तास टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि कोविड योग्य वर्तनाचे पालन हे पाच कलमी धोरण कायम ठेवावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान राज्यांना तसेच पेंद्रशासित प्रदेशांना चाचण्या वाढवण्याचे आदेश पेंद्राने दिले आहेत. 17 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत देशातील सरासरी दैनंदिन ऊग्णसंख्या 571 वरून 4,188 वर पोहोचली. कोविड वर्तणुक नियमांत लसीकरण येत असून बुस्टर लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र राज्यासह संपूर्ण देशातील लसीकरण अहवाल हा बुस्टर डोसबाबत निराशादायी आहे. प्राथमिक
लसीकरण 90 टक्क्यांहून अधिक करण्यात आले. मात्र बुस्टर डोस टाळण्यात आला असल्याचे अहवाल सांगत आहेत. शिवाय सध्याची वाढलेली ऊग्णसंख्याही तेच दर्शवत आहे. त्यामुळेच अधिकाधिक लोकसंख्येला त्यातही विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि असुरक्षित घटकांना लसीकरण करण्याचे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या वाढलेल्या इन्फ्ल्यूएन्झा आणि कोविडच्या ऊग्णांची शोधाशोध युद्ध पातळीवर सुऊ आहे. ऊग्ण लवकरात लवकर शोधणे, चाचणी करणे आणि वेळेवर उपचारांचे व्यवस्थापन करणे हे सुऊ झाले आहे. नव्या सार्सचे ऊग्ण तसेच कोविड-फ्ल्यू सदृश उपप्रकारांचा उद्रेक शोधणे त्याचवेळी तो थांबवणे यावर भर देण्यात येत आहे. सार्स फ्ल्यू सदृश्य वंशावळीतील कोविड उपप्रकारांचा पाठपुरावा करण्यासाठी जिनॉम सिक्वेसिंगला महत्त्व आले आहे.
यातूनच हे कोणते उपप्रकार आहेत? ते सौम्य असून जीवघेणे का नाहीत? कधी पर्यंत जीवघेणे ठऊ शकतात? तिन्ही कोविड लस लाभार्थ्यांवर कितपत परिणाम होत आहे? अशा सारख्या अन्य आरोग्य प्रश्नांच्या सवालांचे उत्तर मिळू शकते. तुर्तास सर्वसामान्यांनी मास्क वापरत, लसीचे डोस पूर्ण करत आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. म्हणजे कोविड त्याच्या कच्चाबच्चा उपप्रकार, व्हेरिएंट वंशावळीसह जेरबंद होऊ शकतो…!
राम खांदारे








