नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2023 मध्ये एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये भारताने 148.58 दशलक्ष टन इतक्या कोळशाची आयात केली आहे. सदरची आयात ही मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये समान अवधीत 32 टक्के अधिक राहिली आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये याच अवधीत 112.38 दशलक्ष टन इतक्या कोळशाची आयात करण्यात आली होती. जगातील कोळसा आयातीच्या यादीमध्ये भारत हा पाचवा देश ठरला आहे. स्थानिक पातळीवरती कोळशाची मागणी मोठ्या प्रमाणात राहिली असून विविध कारखान्यांचे काम वेगाने कार्यरत राहिल्याने कोळशाची मागणी वाढली आहे.









