बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसात 33 नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे आरोग्य विभागाने तपासणी वाढविली आहे. रविवारी रात्री जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार सौंदत्ती तालुक्यात 10, बेळगाव तालुक्यात 2, चिकोडी व खानापूर तालुक्यात प्रत्येकी 1 असे 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 36 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या इस्पितळ आणि काही जणांवर घरी उपचार करण्यात येत आहेत.
Previous Articleग्रामीण पाणीटंचाई निवारणासाठी अधिकाऱ्यांनी तत्पर रहावे
Next Article अट्टल मोटारसायकल चोराला अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









