चोर्ला रस्ता दुरुस्तीचे काम 11 मार्चपासून बंदच : डांबरीकरणाऐवजी माती टाकत असल्याने वाहनधारकांमध्ये आश्चर्य

कणकुंबी : बेळगाव-चोर्ला रस्ता दुऊस्तीच्या कामाला पावणेतीन कोटी ऊपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतू रस्त्याच्या दुऊस्तीऐवजी रस्त्याच्या दुतर्फा माती टाकून चरी बुजवण्याचे काम करण्यात येत असल्याने प्रवासी व वाहनधारकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या कामाबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. बेळगाव ते चोर्ला (गोवा हद्द) रस्त्याच्या दुऊस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावणेतीन कोटी ऊपये मंजूर केलेले आहेत. त्यानुसार सदर रस्त्यावरील ख•dयांचे पॅचवर्कचे काम रणकुंडयेपासून सुरू करण्यात आले. रणकुंडये ते चोर्ला रस्त्यावरील लहान खड्ड्यांचे पॅचवर्क करणे तर जिथे मोठमोठे ख•s असतील ते उखडून त्या रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धारवाडच्या व्यंकटेश या कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार दोन महिन्यापूर्वी रणकुंडये क्रॉसपासून कामाला सुऊवातही करण्यात आली. रणकुंडये ते चिखले क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावरील लहानसहान ख•s वगळून केवळ मोठमोठ्या ख•dयांचे पॅचवर्क करण्यात आले. तर जास्त खराब झालेल्या ठिकाणचा रस्ता उखडून खडीकरण करून त्यावर पुन्हा डांबरीकरण केले आहे. परंतु चिखले क्रॉसपासून ते गोवा हद्दीपर्यंत म्हणजे चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पाठ फिरविण्यात आली आहे. चोर्लापर्यंतच्या रस्ता दुऊस्तीचे काम अर्धवट टाकून कंत्राटदाराने जांबोटी-कणकुंबी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा माती टाकून पावसाळ्यात पडलेल्या चरी बुजविण्याच्या कामाला सुऊवात केली आहे. कंत्राटदाराच्या या अजब कारभारामुळे वाहनधारकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेटणे ते चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरून प्रवास करणे जेखमीचे
बेटणे ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून रस्त्यावर पडलेले ख•s बुजवण्याकडे प्रशासनाने प्रत्येक वेळी दुर्लक्ष केल्याने लहान ख•dयांनी उग्ररूप धारण करून वाहतुकीचा बोजवाराच उडविला. अशा परिस्थितीत चोर्लापासून रस्त्याच्या दुऊस्तीला सुऊवात करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदाराने रणकुंडये क्रॉसपासून रस्त्याच्या दुऊस्तीचे काम हाती घेतले. आणि तेही चोर्लापर्यंत न पोहचविता अर्धवट सोडून पलायन केले. 11 मार्चपासून चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम थांबविण्यात आलेले असून प्राप्त माहितीनुसार कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
पावसामुळे कामात पुन्हा अडथळा
प्लांटवरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगून एक महिन्यापासून रस्ता दुऊस्तीचे काम थांबविण्यात आले आहे. आता केवळ महिना दीड महिन्यामध्ये चोर्ला हद्दीपर्यंत जाऊन पोहोचणे अशक्मय असून 75 टक्के रस्ता खराब झाला आहे. तसेच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कामात अडथळा येणार असून रस्त्यावरील ख•dयांत पाणी साचले तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ वाहनधारक व प्रवासीवर्गावर येणार आहे.
कंत्राटदाराची विचित्र कार्यपद्धती
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यामध्ये संगनमत असल्याचा आरोप कणकुंबी-चोर्ला भागातील नागरिकांनी केलेला असून रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला जाणूनबुजून वेळ काढला जात आहे. जवळपास महिना होत आला तरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांचा संशय बळावला आहे. दुऊस्तीच्या कामाऐवजी गेल्या आठ-दहा दिवसापासून रस्त्याच्या दुतर्फा माती टाकून चरी बुजवण्याचे काम सुरू आहे. म्हणजे रस्त्यावरील ख•s बुजवण्याऐवजी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराकडील चरी बुजवण्याचे काम कंत्राटदाराने हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या बुजवण्याची आवश्यकता सध्यातरी नव्हती. सद्यस्थितीत रस्त्यावरील ख•s बुजविणे म्हणजे पॅचवर्क करणे आणि उखडून टाकलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणे अत्यावश्यक असताना देखील कंत्राटदाराच्या या विचित्र कार्यपद्धतीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.









